भारत-श्रीलंका यांच्यातील मोहालीमधील आगामी एक दिवसीय सामन्यानंतर पंजाब श्वान पथकातील श्वान ‘धोनी’ निवृत्त होणार आहे. दहा वर्षांच्या दिर्घ सेवेनंतर तो निवृत्त होईल. मैदानातील प्रेक्षक आणि खेळाडूंच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा जो ताफा तैनात करण्यात येतो त्यात या श्वानाचाही सहभाग असतो. सध्या मोहालीतील पोलिसांसोबत हा श्वान आपले कर्तव्य बजावत आहे. पण, लवकरच त्याला निरोप देण्यात येणार आहे.
10 फ्रेबुवारी 2007 पासून ‘धोनी’ हा श्वान पंजाब पोलीस दलाच्या सेवेत दाखल झाला. दहा वर्षांच्या सेवेनंतर 13 डिसेंबरला औपचारिकरित्या त्याला निवृत्त करण्यात येईल. धोनीसोबत श्वानपथकातील आणखी दोन श्वानदेखील निवृत्त होणार आहेत. औपचारिक कार्यक्रमाद्वारे या तिघांनाही निरोप देण्यात येईल. ‘धोनी’ तीन महिन्यांचा असल्यापासून त्याला प्रशिक्षण देण्यात आलं होतं. निवृत्तीनंतर धोनीला कोणीही दत्तक घेऊ शकतं. लिलावाद्वारे त्याचं पालकत्त्व कोणाला द्यायचं हे ठरवलं जाणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews